धनश्री भावसार-बगाडे
लठ्ठपणामुळे व्यक्तीचाआत्मविश्वास कमी होतो आणि म्हणूनच तज्ज्ञांना असे वाटते की एखाद्या व्यक्तीचे वजन त्याच्या उंचीवर आधारीत असावे.
अनेक तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी अनेक टिप्स देतात. पण श्री श्री रविशंकर यांनी आपल्या व्हिडीओमध्ये काही खात्रीशीर उपाय सांगितले आहेत.
श्री श्री रविशंकर नियमितपणे वजन कमी करणे आणि खाण्याच्या सवयींबद्दल त्यांचे सखोल ज्ञान शेअर करतात. त्याच्या YouTube चॅनेलवर पोस्ट केलेल्या अशाच एका क्लिपमध्ये, त्यांनी अशाच काही टिप्स शेअर केल्या आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांमध्ये लठ्ठपणा आहे आणि लोकांच्या रोजच्या आहारात नियमितपणे नट्स असणे आवश्यक आहे.
त्या व्हिडीओमध्ये त्यांना अल्कलाइन वॉटरचेही महत्व सांगितले आहे. ज्यामुळे आपल्या शरीराची PH लेव्हल मेंटेन राहते.
त्यांच्या मते वजन कमी करण्यासाठी आहारात नियमितपणे पनीर असले पाहिजे. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने भरपूर असतात.
त्यांनी सांगितलं की व्यक्तीने जेवणाचे नियम काटेकोर पाळले पाहिजेत, दिवसातून एकदाच भाजी पोळी खावे. त्यामुळे वजन वाढत नाही. तसेच, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने कधीही एकत्र करू नयेत.
वजन कमी करण्यासाठी, थोडे थोडे खाण्याचा सराव करणे महत्वाचे आहे. जास्त खाणे टाळण्यासाठी, एका लहान ताटात खावे, कारण यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्याच्या काळात फूड जर्नल तुमचा सर्वात चांगला मित्र असू शकतो, कारण त्यामुळे खाण्याच्या सवयींचा मागोवा घेण्यास आणि सजग आहार घेण्यास मदत होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.