वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज प्या पपईचा ज्यूस..

Aishwarya Musale

वाढलेल्या वजनाच्या समस्येनं आज प्रत्येकजण हैराण आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. काही जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, तर काही योगा आणि डाएटसारख्या गोष्टींचा आधार घेतात.

papaya | sakal

पण, जिममध्ये मेहनत करूनही वजन काही कमी होण्याचं नाव घेत नाही. ज्या लोकांना त्यांचा लठ्ठपणा कमी करायचा आहे, ते पपई खाऊ शकतात.

papaya | sakal

पपई खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊयात, वजन कमी करण्यासाठी पपईचं सेवन कसं करावं.

papaya | sakal

पपईचा रस

वजन कमी करण्यासाठी पपईचा रस बनवा आणि त्याचं सेवन करा. पपईमध्ये असलेली जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स फॅट्स कमी करण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिज्म वाढवतात.

papaya | sakal

नाश्त्यात पपई खा 

नाश्त्यामध्ये पिकलेली पपई खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.

papaya | sakal

दह्यासोबत पपईही खा 

वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दह्यासोबत पपई खाऊ शकता. पपई आणि दही एकत्र खाण्यास अगदी चवदार तर आहेच, पण पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरू शकतं.

papaya | sakal

तुम्ही सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी दही आणि पपई खाऊ शकता.

papaya | sakal

यासाठी एक वाटी दही घ्या आणि त्यात पिकलेल्या पपईचे तुकडे टाका. तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रुट्स घालून खा. 

papaya | sakal

केसांना तूप लावण्याचे हे आहेत खास फायदे! जाणून घ्या

येथे क्लिक करा