Anuradha Vipat
अभिनेता अपारशक्ती खुराना आयुष्मान खुरानाचा धाकटा भाऊ आहे.
आयुष्मान बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
तर अपारशक्ती सहाय्यक भूमिकांमध्ये जास्त दिसतो आहे
अपारशक्ती खुरानाने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याला भावाबरोबर सातत्याने तुलना होते त्याचा त्रास होतो का? असं त्याला विचारण्यात आलं
त्यावर अपारशक्ती म्हणाला की, कधीच नाही, २००% कधीच नाही. खरं तर मी स्वतः ही तुलना होताना पाहिली नाही.
पुढे अपारशक्ती म्हणाला की, या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आम्हाला रोज रात्री एकत्र बसून जेवताना पाहाल. आम्ही एकाच इमारतीत राहतो, एकत्र जेवण करतो, एकत्र व्यायाम करतो.
पुढे अपारशक्ती म्हणाला की, ज्या दिवशी माझा भाऊ मला अशी जाणीव करून देईल की तो मोठा स्टार आहे, तो आमच्या नात्याचा शेवट असेल.