सकाळ डिजिटल टीम
अंजीर हे असं फळ आहे, की लोक ताजे ऐवजी कोरडे जास्त खातात आणि त्यात भरपूर पौष्टिकता असते.
अंजीरचा आहारात समावेश कसा करावा आणि ते जास्त खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात हे जाणून घेऊ..
अंजीर खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती तर मजबूत होतेच, शिवाय हाडेही मजबूत होतात. त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे तुम्ही पचनाच्या समस्यांपासूनही सुरक्षित राहतात.
अंजीर खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते आणि हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.
अंजीर जरी भरपूर प्रमाणात पोषक असले, तरी त्यात भरपूर कॅलरीज आणि गोडवा देखील असतो.
अंजीराचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि वजन वाढण्याचीही शक्यता असते.