Anuradha Vipat
चपचपीत तेल लावलं म्हणजे केसांची आपण खूपच काळजी घेतली असा आपल्याकडे समज आहे पण चपचपीत तेलामुळेचं केसात कोंडा होतो
आपण केसांची स्वच्छता ठेवली नाही तर नैसर्गिक तेल आणि घाणीच्या मिश्रणातही यीस्ट इन्फेक्शन होते व कोंडा होतो.
महिनो न् महिने तेल न लावल्याने व त्यावर त्वचा कोरडी बनवणारे शाम्पू वापरले तर अति कोरडेपणाने आधी खाज उठते आणि मग खाजवल्यानंतर त्वचेत जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि कोंडा होतो
मानसिक ताणतणाव, टेन्शन्स यामुळे कोंडा होतो
पिटिरोस्पोक्म यीस्ट याचे इन्फेक्शन आपल्या डोक्याच्या त्वचेला होते व केसात कोंडा होतो.
आपण केस वेळेवर साफ केले नाहीत तर धूळयुक्त घाणीचा थर डोक्यात साठतो. मृत पेशी बाहेर फेकल्या जात नाहीत आणि मग कोंडा होतो
तणाव आणि थंडीच्या वातावरणात कोंडा वाढण्याची शक्यता आणखी वाढते.