सकाळ डिजिटल टीम
भारतात अनेक मंदिरे आहेत, जिथं तुम्ही शांतपणे बसून तुमच्या देवाचं स्मरण करू शकता.
मंदिरातील अनेक प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू आणि कलाकृती तुमचं नक्की मन जिंकतील.
दिलवाडा मंदिर 12 व्या शतकात बांधलं गेलं. संगमरवरी दगडात कोरलेलं सुबक व सुंदर नक्षीकाम आजही येथे सुरेखपणे जतन केलं आहे. राजस्थानच्या अरवलीमध्ये विविध तीर्थंकरांना समर्पित 5 मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरात जैन ऋषींची चित्रे, सुंदर नक्षीकाम केलेले स्तंभ आणि 360 जैन तीर्थंकरांच्या मुर्तींचा समावेश आहे.
खजुराहो येथील सर्व जैन मंदिरे शहराच्या पूर्वेकडील भागात आहेत आणि मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेचे सुंदर नमुने आहेत. खजुराहो हे छोटे शहर असले तरी, मंदिराची अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
हे मंदिर गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील शत्रुंजय पर्वतावर आहे. पालितानामध्ये 3,000 पेक्षा जास्त सुंदर कोरीव मंदिरे आहेत. 11 व्या शतकात बांधकाम सुरू झालेल्या मंदिराला पूर्ण होण्यासाठी अनेक पिढ्या लागल्या आणि जैन धर्मातील हे एक आदरणीय तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला 3,800 हून अधिक पायऱ्या आहेत, ज्या चढणं कठीण आहे.
कर्नाटकातील श्रवणबेलगोळ शहरात असलेल्या या मंदिरात पहिला तीर्थंकर श्री गोमटेश्वराची 18 मीटर उंच काळ्या ग्रॅनाइट दगडाची मूर्ती आहे. दर 12 वर्षांनी यात्रेकरू येथे मोठ्या जैन उत्सवासाठी येतात. महामस्तकाभिषेकादरम्यान मूर्तीला दूध, केशर, हळद, चंदन आणि सिंदूरचा अभिषेक केला जातो.
अरवली पर्वतरांगेतील अलंकृत रणकपूर मंदिर 14 व्या आणि 15 व्या शतकात बांधले गेले. हे तीन मजली मंदिर 1,444 सुंदर नक्षीकाम केलेल्या संगमरवरी खांबांवर उभे आहे. संगमरवरी खडकावर सापाच्या शिल्पाचाही समावेश आहे.