सकाळ डिजिटल टीम
आयुर्वेदात आवळा औषध म्हणून वापरला जातो.
आवळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅरोटीन, लोह आणि फायबर यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.
आवळ्याच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले फायबर पाचन समस्या दूर ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही, तर याच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म आतड्याची हालचाल सुलभ करून बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
आवळा बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि व्यक्तीला वारंवार आजारी पडण्यापासून रोखतात.
फक्त आवळाच नाही, तर त्याच्या बियांपासून बनवलेली पावडर देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. याच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेवरील वृद्धत्व आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
आवळा बियांच्या पावडरीचे सेवन त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. याच्या नियमित सेवनाने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून त्वचेवर लावू शकता.
आवळ्याच्या बियांपासून बनवलेल्या पावडरमुळे केसांची वाढ सुधारून केस गळणे आणि पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.