Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी योगा अतिशय फायदेशीर आहे.
नियमितपणे योगाचा सराव केल्याने लहान समस्यांपासून ते मोठ्या समस्यांपर्यंत तुम्हाला आराम मिळू शकतो. अनेक आरोग्य तज्ज्ञ दररोज योगासनांचा सराव करण्याचा सल्ला देतात.
योगासनांमध्ये विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो, जे विविध प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक समस्यांसाठी प्रभावी आहेत. या योगासनांमध्ये अनुलोम-विलोमचा समावेश आहे.
अनुलोम-विलोमचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे एक प्रकारचे श्वासोच्छवासाचे योगासन आहे. ज्याचा सराव सर्व वयोगटांमधील लोकांसाठी सुरक्षित आहे.
अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने नैराश्य, ताण-तणाव आणि चिंता दूर होते.
अनुलोम-विलोमचा नियमितपणे सराव केल्याने वजन कमी करता येते. शिवाय, शरीरातील चयापचयाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
अनुलोम-प्राणायामचा दररोज सराव केल्याने राग, अस्वस्थता, विस्मरण आणि निराशा या नकारात्मक भावना दूर होतात.