सकाळ डिजिटल टीम
जगभरात अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात.
अनेक लोक आरोग्यासाठी हर्बल टी घेणे पसंद करतात.
जसं की, ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी. पण तुम्हाला माहीत आहे का? ब्ल्यू टी सुद्धा एक हर्बल टी आहे.
हा चहा निळ्या गोकर्णीच्या फुलांपासून बनवला जातो.
निळ्या गोकर्णीचा वापर भारतात प्राचीन काळापासून वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
वैज्ञानिक भाषेत त्याला 'क्लीटोरिया टरनेटिया' या नावाने ओळखले जाते.
तज्ज्ञांच्या मते, या ब्ल्यू टीच्या सेवनाने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात.
ब्ल्यू टीचे सेवन हार्मोनल संतुलन बनवण्यासाठी मदत करते. हे पीरियड सायकल रेग्युलर करण्यासाठी मदत करते.