पोटापासून ते केस मजबूत होण्यापर्यंत..; 'हे' एक पान दररोज चघळल्याने होतात अनेक फायदे

सकाळ डिजिटल टीम

आपलं आरोग्य कशावर अवलंबून?

सकाळी उठल्याबरोबर आपण काय खातो आणि काय पितो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.

Curry leaves Health Benefits

कढीपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर

आपल्या आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि या पानामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात जाणून घेऊ..

Curry leaves Health Benefits

कढीपत्ता चघळण्याचे फायदे

कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

Curry leaves Health Benefits

कढीपत्त्यामध्ये कोणते घटक आढळतात?

या पानांमध्ये Bioactive Compounds, जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, बीटा कॅरोटिन, प्रथिने, दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात.

Curry leaves Health Benefits

चयापचय सुधारते

रिकाम्या पोटी कढीपत्ता चघळल्याने चयापचय प्रक्रियेला फायदा होतो. कढीपत्ता वजन व्यवस्थापनात देखील मदत करते, ज्यामुळे शरीराचे वजन जास्त प्रमाणात वाढत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Curry leaves Health Benefits

रक्तातील साखरेच्या पातळीसाठी उपयुक्त

कढीपत्ता रक्तातील साखरेच्या पातळीसाठी देखील चांगला आहे. ही पाने चघळल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते.

Curry leaves Health Benefits

केस मजबूत होतात

कढीपत्त्यामध्ये आढळणाऱ्या बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचा केसांसाठी फायदा होतो. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.

Curry leaves Health Benefits

तोंडाची चांगली स्वच्छता

तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी शिळा कढीपत्ता देखील चावून खाऊ शकतो. कढीपत्ता चघळल्याने तोंडातील खराब बॅक्टेरिया निघून जातात आणि तोंड स्वच्छ राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Curry leaves Health Benefits

Ghee Health Benefits : एका दिवसात किती तूप खावे? आरोग्याशी संबंधित जाणून घ्या अनेक फायदे

Ghee Health Benefits | esakal
येथे क्लिक करा