Harshada Shirsekar
मनुष्यप्राण्याचे कान ऐकण्याव्यतिरिक्त अन्य देखील कार्य करतात. त्यांचे हे कार्य आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आपण शरीराचा मसाज ऐकला असेल पण कानांच्या मसाजामुळे आरोग्याला मिळणारे फायदे माहिती आहेत का?
कानांचा मसाज करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेऊया
हातांचे पंजे एकमेकांवर घासावे. यामुळे पंजांमध्ये तुम्हाला ऊब निर्माण झाल्याचे जाणवेल. हे ऊबदार पंजे आपल्या कानांवर ठेवा. यानंतर बोटांच्या मदतीने तेल लावून अथवा तेलाचा वापर न करताच कानांचा मसाज करावा.
पाठदुखीचा त्रास होत असल्यास कानांचा मसाज करावा. यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाच्या हार्मोनचा स्त्राव होतो. ज्यामुळे शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते.
एखाद्याची चिडचिड होत असल्यास किंवा मानसिक ताण, मन अस्वस्थ झाल्यासारखे वाटत असल्यास कानांचा मसाज करावा. या समस्यांपासून आराम मिळतो.
डोकेदुखी किंवा मायग्रेन यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास कानांचा काही मिनिटे मसाज केल्यास आराम मिळू शकतो.
काही लोकांना स्ट्रेसमुळे अपुऱ्या झोपेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे संपूर्ण दिवसाचे गणित कोलमडते. या समस्येपासून सुटका हवी असल्यास कानांचा हलक्या हाताने मसाज नक्की करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.