सकाळ डिजिटल टीम
रोजच्या आहारात फळांच्या रसांचा समावेश केला जाऊ शकतो. फळांमुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच, शिवाय तुमची त्वचा चांगली दिसते.
आपल्या शरीरासाठी अननस खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, मँगनीज, तांबे, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक आढळतात.
पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर ठरतो. अननसाचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि सूज यापासून आराम मिळतो.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अननसाचा रस पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अननसाचा रस देखील पिऊ शकतो. अननसाचा रस शरीराला लोह प्रदान करतो, ज्यामुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते जे शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवतात.
अननसाच्या ज्यूसमध्ये Bromelain असते, ज्यामुळे खराब पेशी नष्ट होतात. शिवाय, शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि मजबूत होते.
अननसाचा रस प्यायल्यानंतर त्याचे फायदे त्वचेवर दिसून येतात. त्वचा मऊ होते, त्वचेचा घट्टपणा वाढतो आणि त्याचा परिणाम सुरकुत्या कमी होण्यात दिसून येतो.