सकाळ डिजिटल टीम
अंडी हा प्रथिनांचा सर्वात महत्वाचा स्त्रोत मानला जातो. जगभरात असंख्य लोक दररोज अंडी खातात. अंडी हा आरोग्यदायी, पौष्टिक नाश्ता आहे.
अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते. एका अंड्यात 70 कॅलरीज, 6 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम फॅट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन, फोलेट आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात.
दररोज 2 अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रोटीन मिळते. एका अंड्यात 6 ग्रॅम प्रथिने असतात, याचा अर्थ शरीराला 2 अंड्यांमधून 12 ग्रॅम प्रथिने मिळतात. या प्रथिनांमुळे स्नायूंना आणि शरीरालाही फायदा होतो.
तज्ज्ञांच्या मते, दररोज दोन अंडी खाल्ल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो. यामुळे तुमचे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहते. 2 अंडी खाल्ल्याने तुमचे हृदय हानीकारक परिणामांपासूनही वाचेल.
अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे पदार्थ असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मानले जातात. त्यांच्या मदतीने तुमचे डोळे हानिकारक निळ्या किरणांपासून सुरक्षित राहतात.
अंड्यामध्ये एक पोषक तत्व असते, जे मेंदूच्या विकासात आणि कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दररोज दोन अंडी खाल्ल्याने बुद्धी वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
दररोज दोन अंडी खाल्ल्याने, तुम्हाला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 मिळेल, जे हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक पोषक मानले जातात.