हाडे मजबूत ते वजन कमी करण्यापर्यंत..; बांबूचे कोंब खाण्याचे कोणते आहेत आरोग्यदायी फायदे?

सकाळ डिजिटल टीम

पोषक तत्वांचे 'पॉवर हाऊस'

बांबूच्या कोंबांना पोषक तत्वांचे 'पॉवर हाऊस' म्हणतात. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर आणि खनिजे असतात.

Benefits Of Eating Bamboo Shoots

कोंबांमध्ये कोणते घटक आढळतात?

या कोंबांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, मँगनीज, व्हिटॅमिन ए, बी 6, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे आणि जस्त या घटकांचा देखील समावेश आहे.

Benefits Of Eating Bamboo Shoots

रोगप्रतिकारशक्ती वाढते

बांबूचे कोंब खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. या कोंबांच्या सेवनाने शरीर सहजासहजी आजारांना बळी पडत नाही.

Benefits Of Eating Bamboo Shoots

हाडे मजबूत होतात

पोटॅशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत असल्याने बांबूची कोंबं हाडे मजबूत करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.

Benefits Of Eating Bamboo Shoots

त्वचेचा घट्टपणा वाढतो

बांबूच्या कोंबांचे सेवन केल्याने त्वचेचा घट्टपणा वाढतो. या कोंबांमध्ये सिलिका (Silica) सामग्री असते.

Benefits Of Eating Bamboo Shoots

वजन कमी होऊ शकते

बांबूच्या कोंबांमध्ये भरपूर फायबर असते. फायबरचे सेवन केल्याने पोट जास्त काळ भरलेले वाटते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी होते. वजन कमी करण्यासाठी बांबूचे कोंबही खाऊ शकतात.

Benefits Of Eating Bamboo Shoots
Benefits Of Eating Bamboo Shoots

तुम्हीही लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिता? मग थांबा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान!

Urine infection | esakal
येथे क्लिक करा