सकाळ डिजिटल टीम
आयुर्वेदात मध आणि काळी मिरी यांचे मिश्रण एक शक्तिशाली नैसर्गिक औषध मानले जाते. मध स्वतःच अमृत आहे, तर काळी मिरी मसाल्यांची राणी मानली जाते.
दोन्हींचे मिश्रण आरोग्यासाठी चमत्कारिक मानले जाते. आयुर्वेदात यांच्याकडे अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून पाहिले जाते.
मधामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तर, काळ्या मिरीमध्ये Piperine नावाचे संयुग असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
काळी मिरी अन्न चांगले पचण्यास मदत करते. तर, मध पोटाची जळजळ किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.
सर्दी आणि खोकल्यावरील उपचारांसाठी मध हा एक लोकप्रिय घरगुती उपाय आहे. तर, काळ्या मिरीत सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करणारे नैसर्गिक गुणधर्म आढळतात.
काळ्या मिरीमधील पाईपरीन शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते, तर मधामध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीराला ऊर्जा प्रदान करते.
मध आणि काळी मिरी यांचे मिश्रण त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. मध त्वचेला हायड्रेट करते आणि तिची चमक वाढवते, तर काळ्या मिरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेची जळजळ आणि मुरुम कमी करण्यास मदत करतात.
मध आणि काळी मिरी यांचे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा मधामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. हे मिश्रण शरीराला ताजेपणा देईल आणि दिवसभर ते उत्साही ठेवण्यास मदत करेल.