सकाळ डिजिटल टीम
तुपाचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जातो.
तूप हे आयुर्वेदात औषध म्हणून ओळखले जाते. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस सारखे घटक पुरेसे प्रमाणात आढळतात.
तुपात असलेले हेल्दी फॅट्स शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. तुपामुळे इतर प्रकारच्या चरबीप्रमाणे हृदयविकार होत नाही.
तूप पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. तुपाचे सेवन केल्याने आतडे निरोगी राहते, त्यामुळे अल्सर आणि कॅन्सरची शक्यता कमी होते.
तुपात असलेले ब्युटीरिक अॅसिड शरीराला रोगाशी लढणाऱ्या टी-सेल्स तयार करण्यास मदत करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांशी लढण्याची ताकद मिळते.
तूप खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. तुपातील ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी अॅसिड मेंदूचे कार्य सुधारून स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. यातील जीवनसत्त्वे त्वचेला घट्ट ठेवतात आणि वृद्धत्वापासून वाचवतात.
रोज एक चमचा कोमट तूप खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे व्यक्तीला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात गॅस बनण्याची समस्या येत नाही.
दिवसातून 1 ते 2 चमचे तूप खाण्याची शिफारस केली जाते. या प्रमाणापेक्षा जास्त तूप खाल्ल्याने व्यक्तीला अपचन होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.