सकाळ डिजिटल टीम
बदलत्या हवामानात माणसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला मौसमी आजार आणि संसर्गापासून स्वतःला वाचवायचं असेल, तर तुम्ही लिंबूचे सेवन करू शकता.
आयुर्वेदानुसार, लिंबूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. लिंबूमध्ये तांबे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, झिंक, अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे
लिंबूमध्ये फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. याद्वारे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करता येते. बदलत्या ऋतूमध्ये लिंबाचे सेवन केल्याने तुम्ही अनेक मौसमी आजार आणि संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकता.
लिंबूच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. व्हिटॅमिन सी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
लिंबूमध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोट साफ करते आणि पचन सुधारण्यास मदत करते.
लिंबू जास्त प्रमाणात खाणे टाळावे. त्यात सायट्रिक अॅसिड असते, ज्याचे प्रमाण वाढल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. अशा स्थितीत लिंबू कमी खावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.