सकाळ डिजिटल टीम
पिंपळाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. याचा वापर केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
पिंपळाच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे अनेक आरोग्यदायी फायदे प्रदान करते.
पिंपळाच्या पानांचे चूर्ण दातांवर चोळून अथवा पाने चावून खावीत. तसेच पिंपळाच्या पानांचा रस किंवा पाण्यात पिंपळाची पाने उकळून सेवन करता येते.
पिंपळाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचे सेवन करा. तसेच हिरड्यांची अॅलर्जी कमी करण्यास आणि दात स्वच्छ करण्यासही मदत होते.
पिंपळाच्या पानांचे पाणी सेवन केल्याने श्वास आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय, हे पचनासाठी फायदेशीर आहे.
पिंपळाच्या पानांमध्ये जैव क्रियाशील गुणधर्म आढळतात. यामुळे काविळीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.
पिंपळाच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. याच्या पानांचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.