सकाळ डिजिटल टीम
पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. याचे पान यकृत, मूत्रपिंड आणि हृदयासाठी अत्यंत गुणकारी आहे. याच्या सेवनाने ७० वर्षे हे अवयव निरोगी राहतात, असं तज्ञांचं मत आहे.
पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे पपईच्या झाडाला आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे. केवळ पपईच्या फळातच नाही तर पूर्ण झाडातच अनेक औषधी गुणधर्म लपलेले असतात.
पपईच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅरोटीन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांसह जीवनसत्व अ, ब, क, ड, आणि ई, तसेच यामध्ये कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, लोह व फॉस्फरस ही खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी पपई खूप फायदेशीर आहे. पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन तसेच इतर जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
जर तुम्हाला आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये त्रास होत असेल तर पपईची पाने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामध्ये बऱ्याच पाचक एंजाइम असतात, जे आपली पाचन शक्ती सुधारण्यास मदत करतात.
पपईच्या पानांचा रस अशा समस्या विशेषतः डेंग्यूसारख्या आजारांना रोखण्यासाठी चांगले काम करतो. हा रस ताप, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि त्वचेची जळजळ यासारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवतो.
पपईच्या पानांचा रस शरीरातील अंतर्गत आणि बाह्य जळजळ कमी करण्यासाठी उत्तम आहे. ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांनी नियमितपणे पपईच्या पानांचा रस सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
पपईच्या पानांचा रस बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पपईची पाने बारीक चिरून ब्लेंडर किंवा सिल्बेटमध्ये बारीक करून घ्या. त्यात थोडे पाणी घालून ज्यूस तयार करून तो फिल्टर करून प्यावा. चवीनुसार थोडे मीठ, साखर किंवा गूळ घालू शकता. हा रस तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता.