'या' लहान बिया आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत, त्या खाल्ल्यास शेकडो फायदे होतील!

सकाळ डिजिटल टीम

भोपळ्याच्या बियांमध्ये कोणते घटक आढळतात?

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम, जस्त आणि इतर पोषक घटक यात पुरेशा प्रमाणात आढळतात.

Pumpkin Seed Benefits

मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त

भोपळ्याच्या बियांचा दररोज आहारात समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकतात.

Pumpkin Seed Benefits

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी आवश्यक पोषक आहे. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहते. तसेच, याचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Pumpkin Seed Benefits

वजन कमी करण्यास उपयुक्त

भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी करण्यातही मदत होते. वजन कमी करण्यासाठी, आपण आपल्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या बियांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते.

Pumpkin Seed Benefits

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

भोपळ्याच्या बिया महिलांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. या बिया महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा स्थितीत महिलांनी रोज सकाळी भोपळ्याच्या बिया खाव्यात.

Pumpkin Seed Benefits

सांधेदुखीत फायदेशीर

भोपळ्याच्या बिया खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Pumpkin Seed Benefits

गर्भवती महिलांपासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत..; आणखी कोणते आहेत डाळिंबाचे फायदे?

Pomegranate | esakal
येथे क्लिक करा