सकाळ डिजिटल टीम
आपले 80 टक्के आरोग्य आपल्या आहारावर अवलंबून असते, असे डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
कोणती फळे आणि भाज्या आपल्यासाठी चांगली आहेत हे ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांचा रंग.
गडद हिरव्या आणि जांभळ्या रंगाची फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात.
आपण सगळे पांढरे बटाटे खातो. तुम्ही लाल बटाटे देखील पाहिले असतील. जांभळ्या रंगाचा बटाटा देखील आहे, जो भारतात 'नीलकंठ' म्हणून ओळखला जातो.
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, 'जांभळ्या बटाट्यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला अनेक मोठ्या आजारांपासून वाचवू शकतात.'
जर तुम्हाला बटाटे आवडत असतील, तर तुम्ही जांभळ्या रंगाचे बटाटे खाऊ शकता. बटाट्याच्या इतर जातींच्या तुलनेत जांभळ्या बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फारसे नुकसान होत नाही.
नीलकंठ बटाट्यामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या बटाट्यापेक्षा तिप्पट अँटीऑक्सिडंट्स असतात. हे तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात. हे कोलेस्ट्रॉल आणि डोळ्यांसाठी चांगले आहे.
नीलकंठ बटाटा हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगापासूनही संरक्षण करते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
एका अभ्यासात असं दिसून आलंय, की जांभळ्या बटाट्याच्या अर्काने उपचार केलेल्या कर्करोगाच्या पेशींची वाढ खूपच कमी होती. काही प्रकरणांत कर्करोगाच्या पेशींचा मृत्यू देखील आढळून आला. हा अभ्यास प्रयोगशाळेत उंदरांवर करण्यात आला असला तरी, त्यामुळे त्याचा मानवावर काय परिणाम होईल हे सांगता आले नाही.