सकाळ डिजिटल टीम
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर तुम्ही रक्त वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं वापरू शकता.
यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. तुमच्यात हिमोग्लोबीनची कमतरता वाढवण्यासाठी मनुके उपयोगी पडू शकतात.
भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.
भिजवलेल्या मनुक्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. रोज आहारासोबत मनुका खाल्ल्यास पचनाच्या समस्येपासून सुटका मिळते. तुम्ही एकाचवेळी 1 ते 12 मनुके एक ग्लास पाण्यात भिजवून खाऊ शकता.
दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. अशावेळी दात आणि हाडांसाठी तुम्ही नियमित मनुका खाऊ शकता. 100 ग्रॅम बेदाण्यामध्ये सुमारे 50 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. ज्यामुळे तुमचे दात आणि हाडे मजबूत होतात.
तुमचे वजन वाढत नसेल तर भिजवलेले मनुके खा. त्यामुळे तुमचे वजन सहज वाढू शकते. याशिवाय, ऊर्जा वाढवण्याची क्षमताही वाढण्यास मदत होते.
भिजवलेल्या मनुकांमध्ये पोटॅशियम असते. यामुळे उच्च रक्तदाबाची स्थिती सुधारते. तज्ज्ञांचा मतानुसार मनुका खाल्ल्याने तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येशी बिनधास्त लढू शकता.
भिजवलेल्या मनुक्यांसाठी तुम्हाला दररोज 50 ग्रॅम मनुका आणि 1 छोटा ग्लास स्वच्छ पाणी आवश्यक आहे. यासाठी रोज रात्री मनुका स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगल्या धुवून घ्या.
धुतल्यानंतर एका भांड्यात किंवा ग्लासमध्ये या मनुका घ्या. पाण्याचा हा ग्लास नीट झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर प्रथम मनुकांचे पाणी प्या आणि नंतर मनुका खा.