सकाळ डिजिटल टीम
शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी पोषक तत्त्वांनी भरपूर भाज्या आणि फळे सेवन करायला हवे. सफरचंद, केळी, पेरू, द्राक्षे ही फळे प्रत्येक जण खात असतात.
पण, तुम्ही कधी वॉटर अॅपल (Water Apple) खाल्ले आहे का? याचे शरीराला खूप फायदे असतात. वॉटर अॅपल हे एक ट्रॉपिकल फ्रूट आहे, जे आग्नेय आशियामध्ये जास्त पाहण्यास मिळते.
हे फळ भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजे जसे की, केरळ, आंध्रप्रदेशमध्ये देखील पाहवयास मिळते. चला तर जाणून घेऊया वॉटर अॅपल का खावे?
वॉटर अॅपल शरीराला हायड्रेड ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात नेहमी शरीराला पाण्याची कमतरता भासते.
डिहाइड्रेशनपासून वाचण्यासाठी वॉटर अपलचे सेवन करणे आरोग्यदायी असते. ते अँटिऑक्सिडेंटनेही भरपूर असते.
वॉटर अॅपल हे गॅलिक अॅसिड, टॅनिन आणि क्वेरसेटिन सारख्या स्ट्रॉन्ग अँटिऑक्सिडेंटने भरपूर असते. हे फ्री रेडिकल्समुळे शरीराला होणाऱ्या नुकसानपासून वाचवते.
याशिवाय, ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि सुजणे देखील कमी करते. वॉटर अॅपलचे सेवन करून तुम्ही वजन देखील कमी करू शकतात. यामध्ये फायबरचे प्रमाण असते.
वॉटर अॅपलमध्ये पोटॅशियमची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. वॉटर अॅपल खाल्ल्याने हृदय आरोग्यदायी राहते. तसेच हाय ब्लड प्रेशरची देखील समस्या दूर राहते.