सकाळ डिजिटल टीम
अनेकांना मिठाचे पाणी प्यायला आवडते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते, परंतु जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर काय होईल? जाणून घेऊया..
तज्ञांच्या मते, मिठामध्ये सोडियम आणि क्लोराईड खनिजांचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत त्याच्या पाण्याचे जास्त सेवन केल्यास आजारांचा धोका वाढतो.
जास्त मीठ पाणी प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात. हाडे तुटण्याचा धोकाही वाढतो.
जास्त मिठाचे पाणी प्यायल्याने लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढते. त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
जास्त मीठ असलेले पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. पाण्याची कमतरता असल्यास साधे पाणी प्यावे.
जास्त मीठ (खारट) पाणी प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमच्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे लोकांना किडनी स्टोनचा धोका वाढतो.
दिवसातून एकदा मीठ पाणी प्या आणि 25 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका. यासाठी काळे मीठही वापरले जाऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.