सकाळ डिजिटल टीम
ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी, तसेच त्वचा आणि केस मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के यासह अँटीऑक्सिडंट, लोह, ओमेगा-3 फॅटी, ॲसिड, खनिजे आदी पोषक घटक असतात.
ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. परंतु, त्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. यात बीपी कमी करणारे गुणधर्म आहेत. ऑलिव्ह ऑइलचे जास्त सेवन केल्याने रक्तदाबामध्ये झपाट्याने घट होते.
ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामध्ये जास्त चरबीयुक्त सामग्रीमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे अतिसार होऊ शकतो.
ऑलिव्ह ऑइलचा वापर त्वचेच्या काळजीसाठीही केला जातो. त्यात व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे संरक्षण करतात आणि त्वचेला हायड्रेटिंग, पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात.
काही लोकांना ऑलिव्ह ऑइलची अॅलर्जी देखील होऊ शकते, ज्यामुळे सूज, एक्जिमा, श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.