Green Tea Side Effects : वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन टी' पिताय? मग, 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन टीचे दुष्परिणाम

बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन टी'चे सेवन करतात.

Green Tea Side Effects

ग्रीन टीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

ग्रीन टीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते.

Green Tea Side Effects

झोपेवर मोठा परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टीमध्ये कॅफिन कमी प्रमाणात असते. जर तुम्ही ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केले, तर त्याचा तुमच्या झोपेवर मोठा परिणाम होतो.

Green Tea Side Effects

डोकेदुखीची समस्या

रोज ग्रीन टी प्यायल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. पण, जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

Green Tea Side Effects

ॲसिडिटी आणि गॅस

ग्रीन टीमध्ये टॅनिन तत्व असते, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ॲसिडिटी आणि गॅस सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Green Tea Side Effects

उलट्या आणि मळमळ

दररोज जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्याने उलट्या आणि मळमळ होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

Green Tea Side Effects

हाडांच्या समस्या

दररोज जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्याने संवेदनशील लोकांना हाडांच्या कमकुवतपणामुळे अधिक समस्या उद्भवू शकतात.

Green Tea Side Effects

गर्भावर परिणाम ते यकृतासाठी हानिकारक; कारले खाण्याचे कोणते आहेत फायदे-तोटे?

Karela Juice Benefits | esakal
येथे क्लिक करा