सकाळ डिजिटल टीम
आजकाल डोकेदुखीची समस्या खूप सामान्य झाली आहे. मात्र, कधी-कधी हा त्रास ब्रेन ट्यूमरसारख्या जीवघेण्या आजारामुळेही होऊ शकतो.
ब्रेन ट्यूमरमुळे शरीरात अनेक लक्षणे दिसू शकतात. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला शरीरात दिसणाऱ्या ब्रेन ट्यूमरच्या काही सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत..
ब्रेन ट्यूमरच्या समस्येमुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरच नव्हे, तर डोळ्यांवरही विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुमची दृष्टी क्षीण होऊ लागते.
ब्रेन ट्यूमरमुळे एखाद्या व्यक्तीला उलट्या आणि मळमळ होऊ शकते. यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो.
ब्रेन ट्यूमर झाल्यास व्यक्तीच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत कालांतराने व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू लागते. या स्थितीत स्मरणशक्ती कमी होते.
ब्रेन ट्यूमरमुळे शरीर खूप कमकुवत होऊ लागते. अशा स्थितीत दिवसभर थकवा जाणवतो. यासोबतच वजन अचानक कमी होण्यास सुरुवात होते. चुकूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका.
ब्रेन ट्यूमरची समस्या रेडिएशन, अनुवांशिक कारणे आणि वाढत्या वयामुळे असू शकते. जर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे दिसत असतील तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.