Silent Heart Attack शांतपणे येतो अन् बसल्या जागी व्यक्तीचा जीव घेतो; धोकादायक लक्षणे कोणती?

सकाळ डिजिटल टीम

सायलेंट हार्ट अटॅकची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच, टीव्ही अभिनेता विकास सेठी याचंही वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी सायलेंट हार्ट अटॅकच्या झटक्याने निधन झाले.

Silent Heart Attack Symptoms

सायलेंट हार्ट अटॅक अतिशय शांतपणे येतो आणि बसल्या जागी व्यक्तीचा जीव घेतो. ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत.

Silent Heart Attack Symptoms

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे

सायलेंट हार्ट अटॅक हा असा हृदयविकाराचा झटका आहे, ज्याची लक्षणे फार कमी असतात. ना छातीत दुखतं, ना श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. सामान्य हृदयविकाराच्या झटक्यात मात्र हा त्रास जाणवतो.

Silent Heart Attack Symptoms

सायलेंट हार्ट अटॅक कोणाला येतो?

सायलेंट हार्ट अटॅकचे जोखीम घटक हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच असतात. वय, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, व्यायामाचा अभाव, तंबाखू सेवन इत्यादी घटक सायलेंट हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतात.

Silent Heart Attack Symptoms

धाप लागणे

ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या आवश्यक कार्ये करत असताना अचानक धाप लागतो, त्यांनी सायलेंट हार्ट अटॅकच्या शक्यतेबद्दल सावध असले पाहिजे.

Silent Heart Attack Symptoms

शरीराच्या वरच्या भागात अस्वस्थता

हात, मान, जबडा किंवा पाठ यासह शरीराच्या वरच्या भागांमध्ये अस्वस्थता हे सायलेंट हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.

Silent Heart Attack Symptoms

मळमळ-चक्कर येणे

सतत मळमळ, कधीकधी सौम्य डोकेदुखी किंवा चक्कर येणे हे देखील एक लक्षण आहे, यावरून हृदय नीट काम करत नसल्याचं दिसून येतं.

Silent Heart Attack Symptoms

थकवा जाणवणे

हलकं काम करतानाही तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर ते सायलेंट हार्ट अटॅकचं सौम्य लक्षण असू शकतं. हृदयाच्या खराब आरोग्यामुळे शरीराला पुरेशी उर्जा मिळत नाही, त्यामुळे अनेकदा थकवा जाणवतो.

Silent Heart Attack Symptoms

Heart Attack ते हार्ट ब्लॉकेजपर्यंत..; दररोज 'इतकी' मिनिटे चालण्याने हृदयाचे आजार होतात दूर

Benefits of Walking | esakal
येथे क्लिक करा