सकाळ डिजिटल टीम
हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सध्या वाढल्याचं दिसत आहे.
हार्ट अटॅकमुळे प्राण गेल्याची उदाहरणं तुम्हीही पाहिली असतील.
जीवनशैलीतले बदल, व्यायामाची कमतरता, अयोग्य आहार, व्यसनं करणे ही काही सामान्य कारणं आहेत.
हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी या सगळ्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे.
तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर योग्य ते उपचार, टेस्ट्स, औषधे घ्यायला हवीत.
त्याचबरोबर हार्ट अटॅक येण्याआधीचे तीन संकेत तुम्ही ओळखलेत तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो, जेणेकरून तुम्ही वेळीच मदत मागू शकता.
१. तुम्ही चालायला लागलात तर अचानक जास्त घाम येणे
२. श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे
३. छाती आणि डावा खांदा दुखणे आणि मग वेदना हळूहळू हाताकडे जाणे
असे संकेत तुम्हाला दिसल्यास वेळ न दवडता त्वरीत रुग्णालयात दाखल व्हा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.