Anuradha Vipat
अभिनेता कार्तिक आर्यनने तो मोठा होत असताना आलेल्या आर्थिक अडचणींबद्दल भाष्य केलं आहे.
तसेच मुलाखतीत कार्तिकला विचारण्यात आलं की स्टारडमनंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत.
उत्तर देत कार्तिक म्हणाला, “मी ग्वाल्हेरमध्ये मोठा होत असताना आमच्यावर कर्ज होतं, कारण माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या करिअरसाठी कर्ज घेतले होते.
कार्तिक पुढे म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हाही मी शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. मुंबईत आल्यावर मला समजलं की आता मला पैसे कमवावे लागतील, कारण मी पैसे उधार घेऊन, ट्रेनने प्रवास करून थकलो होतो
कार्तिक आर्यनला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी ७० हजार रुपये मिळाले होते.
याशिवाय कार्तिकने इंडस्ट्रीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही सांगितले.
कार्तिक म्हणाला, “मी जेव्हा अवॉर्ड शोमध्ये जायचो तेव्हा कोणाकडून तरी लिफ्ट घ्यायचो. मी ठरवलं की जेव्हा माझ्याकडे पैसे असतील तेव्हा मी कार घेईन. मी घेतलेली पहिली कार थर्ड-हँड होती.