Anuradha Vipat
Bigg Boss Marathi 5 च्या पर्वात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारलेला स्पर्धक धनंजय पोवार
आता धनंजयने एका मुलाखतीत वडिलांबरोबरचा अबोला बिग बॉसमुळे दूर झाला असे वक्तव्य केले आहे.
धनंजय पोवार मुलाखतीत वडील बिग बॉसच्या घरात आले होते त्या क्षणाबद्दल बोलताना दिसला आहे
धनंजयने म्हटले आहे की,माझ्या वडिलांनी गेल्या ३८ वर्षांत मला मिठी मारली नव्हती, डोळ्यात पाणी आणलं नव्हतं किंवा माझ्याही डोळ्यांत पाणी आलं नव्हतं.
धनंजयने म्हटले आहे की, गेली ३२ वर्षे माझा वडिलांबरोबर अबोला होता. कामापुरतं, जेवलास काय वगैरे इतकंच बोलायचो.
पुढे धनंजयने म्हटले आहे की, मी कमवायला सुरुवात केली त्यावेळी आमच्यात खटके उडाले. पैसे मिळविण्याच्या नादात माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या. त्यामुळे वडील माझ्यावर खूप नाराज झाले होते.
पुढे धनंजयने म्हटले आहे की, त्यांची नाराजी आर्थिक नुकसानीसाठी नव्हती तर त्यांचे न ऐकल्याबद्दलची होती. जेव्हा बिग बॉसच्या घरात धनंजयचे वडील घरात आले होते त्यावेळी ते दोघेही भावूक झाल्याचे दिसले होते.