Anuradha Vipat
९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित.
श्रीदेवी आणि माधुरी या दोघींमध्ये कधीही संवाद झाला नसल्याचे माधुरीने सांगितले आहे.
तसेच आता एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने श्रीदेवीसोबतच्या शत्रुत्वावर मौन सोडले आहे
माधुरी म्हणाली की, ती श्रीदेवीचा खूप आदर करते. दोघीही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असल्याने त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही
माधुरी दीक्षितने पुकार चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी केली होती.
यावेळी माधुरीने सांगितले की, श्रीदेवी प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त होती आणि तिचे लक्ष तिच्या भूमिकेवर होते.
पुढे माधुरीने सांगितले की, त्यामुळं दोघींमध्ये फार कमी बोलणं व्हायचं.