सकाळ डिजिटल टीम
मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना प्रेक्षक अजूनही पसंत करतात. त्यांचे सिनेमे, त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायमचं चर्चेत राहील आहे.
सुप्रिया आणि सचिन यांना श्रिया नावाची एकुलती एक मुलगी आहे पण श्रियाच्या जन्मापूर्वी सचिन आणि सुप्रिया एका मुलीचा सांभाळ केला होता.
सचिन आणि सुप्रिया यांनी त्यांच्या मित्राच्या मुलीला करिश्माला ती लहान असताना दत्तक घेतलं होतं. याबाबत त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नव्हती.
कुलदीप मखनी हे हॉटेल मालक होते आणि तिथेच सुप्रिया आणि सचिन यांची किट्टूशी ओळख झाली. तेव्हा तिची आई आजारी असल्यामुळे किट्टूचा सांभाळ करण्याचा निर्णय सुप्रिया यांनी घेतला.
लहान असताना किट्टू सचिन यांच्या घरी राहिली पण काही काळाने किट्टूचे वडील तिला लंडनला घेऊन गेले आणि याबाबत त्यांनी सचिन यांना काहीच सांगितलं नाही. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. पण नंतर मखनी कुटूंबियांनी श्रियाच्या जन्मामुळे त्यांनी किट्टूला परत पाठवलं असा आरोप केला.
सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हंटल आहे की, किट्टू भारतात अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी आली होती. मी तिला जी लागेल ती मदत केली पण तिच्या वागण्यामुळे तिला इन्स्टिट्यूटमधून काढून टाकण्यात आलं तर ती राहत असताना श्रियाला देखील तिच्या वागण्याचा त्रास होत होता.
किट्टूने सचिन यांच्या कुटूंबावर अनेक आरोप केले. किट्टू म्हणजेच करिष्मा आता लंडनमध्ये राहत असून तिने अभिनेता विक्रम आचार्यशी लग्न केलं आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत.