कार्तिक पुजारी
बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीमला २१ दिवसांची फर्लो मंजूर झाली आहे
एखाद्या कैद्याला फर्लो किंवा पॅरोल दिला जातो म्हणजे काय होतं? यात नेमका काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया
कौटुंबिक, व्यक्तिगत आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी फर्लो दिला जातो
एका वर्षात कैदी तीन वेळा फर्लो घेऊ शकतो. फर्लोमध्ये कैद्याचे तुरुंगातील आचरण, वर्तन लक्षात घेतलं जातं
पॅरोल सर्वसाधारणपणे आजार, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, लग्न, संपत्तीसंबंधी वाद, शिक्षण या सारख्या कारणासाठी दिला जातो
पॅरोलचा कालावधी एकूण शिक्षेमध्ये मोजला जातो. शिक्षेचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॅरोल दिला जाऊ शकतो.
खटला सुरु असलेल्या कैद्याला देखील पॅरोल मिळतो