सकाळ डिजिटल टीम
झटपट ऊर्जा देणाऱ्या फळांचा विचार केला, तर केळी पहिल्या क्रमांकावर येते.
म्हणूनच बहुतेक लोक नाश्त्यामध्ये याचा समावेश करतात, जेणेकरून ते दिवसभर उत्साही राहतील.
हे फळ पोषक तत्वांचं भांडार आहे. यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, जीवनसत्व अ आणि लोह आणि खनिजे आढळतात. पण, ते खाताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आयुर्वेदानुसार, केळीसोबत आंबट फळांचे सेवन करू नये. यामुळे वात, पित्त आणि कफमध्ये असंतुलन होऊ शकते. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ लिंबू, डाळिंब, स्ट्रॉबेरी यासारख्या गोष्टी खाण्यास मनाई करतात.
केळासोबत ब्रेड कधीही खाऊ नका. या दोन्हींचे मिश्रण चांगले मानले जात नाही. कारण, ब्रेडमध्ये प्रोसेस्ड कार्ब्स असतात, जे पचायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.
मटण खाल्यानंतर चुकूनही कधी केळी खाण्याचा प्रयत्न करू नका. कारण, यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते. शिवाय, पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.
केळीसोबत दूधही पिऊ नका. कारण, केळी हे आम्लयुक्त असते जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. याशिवाय केळासोबत मुळा खाऊ नये, ते तुमच्यासाठी हानिकारकही ठरु शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.