Saisimran Ghashi
काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आधीच्या पिढ्यांकडून चालत आलेला वारसा आणि सध्याच्या बदललेल्या खाण्याच्या आवडी यात मोठी तफावत आढळते.
अशीच एक गोष्ट लहानपणापासून आपण ऐकलेली आहे की मासे खाल्ल्यावर दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत.
तर चला जाणून घेऊया या मागे नेमकी कारणे काय आहेत. मासे आणि दूध याचे एकत्र सेवन काय करू नये यामागच शास्त्र काय आहे.
मासे खाल्ल्यानंतर दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही कारण मासे खाल्ल्यानंतर दूध पिण्याने ल्युकोडर्मा होऊ शकतो,असा समज आहे.
ल्युकोडर्मा हा त्वचारोग आहे. ज्यामध्ये शरीरावर पांढरे डाग पडतात.
आयुर्वेदातही मासे खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विज्ञानानुसार, मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्याने दोन प्रोटीनयुक्त पदार्थ एकत्र शरीरात जातात, ते पचवण्यासाठी वेगवेगळे पाचक रस लागतात, ज्यामुळे पचनास त्रास होतो, तसेच शरीराच्या प्रतिकार शक्तीवर दुष्परिणाम होतात.
मासे खाल्ल्यानंतर सुमारे 4 तास किंवा त्याहून अधिक वेळाने दुधाचे सेवन करा. जर तुम्ही रात्री मासे खात असाल तर दिवसा दूध प्या.
त्वचारोगतज्ञ दोन्ही एकत्र घेण्यास नकार देतात, त्यांच्यामते, हे पदार्थ एकत्र घेतल्याने ऍलर्जी होऊ शकते. पण होय, जर तुम्ही ते खूप जास्त प्रमाणात सेवन केले तरच असे होईल.
पांढरे डाग आणि दूध आणि मासे यांच्यात थेट संबंध आढळून आलेला नाही. तरीपण एकाच दिवशी या दोन्हींचे सेवन टाळणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरेल.