Saisimran Ghashi
प्रत्येक कोपऱ्यात मिळणाऱ्या मोमोजची चव आपल्याला वेड लावते, पण हे व्यसन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
मोमोज खाल्ल्याने फूड पॉइसनींग होऊन हैदराबादच्या एका व्यक्तीने जीव गमावला आहे आणि 20 जण रुग्णालयात आहेत.
मोमोजमध्ये असलेले तेल आणि चरबी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून हृदयाच्या आजारांचे निमंत्रण देतात.
मोमोजमध्ये असलेले मसाले आणि तेल पोटात जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकतात.
मोमोजमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ते नियमित खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.
मोमोजमध्ये आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
मोमोजऐवजी आपण घरगुती भाज्या, फळे आणि धान्य यांसारखे आरोग्यदायी पर्याय निवडू शकतो.
ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही आरोग्याच्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.