कार्तिक पुजारी
त्वचा ग्लोईंग आणि तरुण राहण्यासाठी महिला अनेक महागडे प्रोडक्ट वापरत असतात. अनेकदा घरगुती उपाय देखील केले जातात
चेहऱ्यावर गुलाब जल आणि मध देखील लावले जाते. याचे मिश्रण वापरल्याने नेमकं काय होतं हे जाणून घेऊया
हे मिश्रण अँटी बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सि़डेंट असते. त्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. यात व्हिटॅमन सी, व्हिटॅमिन-अ, व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन ई, सिट्रिक अॅसिड इत्यादी पोषक तत्व असतात
गुलाब जल आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरी काळे डाग कमी करण्यास मदत होते
त्वचा कोरडी पडत असेल तर गुलाब जल आणि मधाचे मिश्रण फायद्याचे ठरते. यामुळे त्वचा सॉफ्ट होते
आठवड्यातून तीन वेळा हे मिश्रण लावल्याने चेहरा उजळतो, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी देखील याचे मिश्रण फायद्याचे ठरते
दोन चमचे गुलाब जलमध्ये एक चमका मध टाका. चेहऱ्यावर याचा लेप १५ मिनिटे ठेवा, त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या