साक्षी राऊत
विमानात बसण्याचा अनुभव प्रत्येकासाठी फार आठवणदायी असतो. विमानाच्या खिडकून दिसणारे ढग आणि उंचावरून दिसणारं इवलंस जग एकंदरीत डोळ्यांत साठून बसतं.
विनान प्रवासादरम्यान अचानक कधी विमानात बिघाड आल्यास नेमकं काय होतं? तुम्ही कधी इनरजंसी लँडिंग ऐकलं आहे काय?
ही घटना १७ एप्रिल २०१८ मध्ये घडली होती. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये शहराच्या Lagurdia Airport वरून फ्लाइट नंबर 1380 न्यूयॉर्कच्या डलासमधून उड्डान करत होते. या फ्लाइटला ५६ वर्षीय महिला चालवत होती.
या फ्लाइटमध्ये १४४ प्रवाशांसह ५ क्रूज मेंबर्स होते. या फ्लाइटच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये जोरदार धमाका झाला.
यावेळी पायलटने काय केलं असेल?
धमाक्याच्या दुसऱ्या सेकंदाला पायलट ATC टॉवरला कॉन्टॅक्ट करण्यात यशस्वी झाले. यावेळी त्यांना विमान इमरजंसीमध्ये लँड करण्याची सुचना मिळते. अशाप्रकारे १४९ लोकांपैकी १४८ लोकांचा जीव वाचवण्यात ते यशस्वी होतात.
विमानाचं एक इंजिन फेल झाल्यास अशा वेळी दुसऱ्या इंजिनच्या साहाय्याने सेफ लँडिंग शक्य आहे.
विमानाचे सगळेच इंजिन फेल झाल्यास विमान विना इंजिन एअर ग्लायडिंगने १०० किमीपर्यंत उडू शकतं. विमानाच्या पंखांवरून जाण्याऱ्या हवेमुळे ते शक्य आहे.
विमानात कुठलाही बिघाड झाल्यास त्याला योग्यपद्धतीने हँडल करणे हे पायलटच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असते. कारण यावेळी संपूर्ण प्रेशर पायलटवर असतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.