आशुतोष मसगौंडे
A1 आणि A2 गाईच्या दुधात आढळणाऱ्या दोन प्रकारचे बीटा-केसिन प्रोटीन असतात.
A1 प्रोटीन बद्दल बोलायचे तर ते उत्तर युरोपियन जातीच्या गायींच्या दुधात आढळते.
A2 प्रोटीन बहुतेक साहिवाल आणि गीर सारख्या भारतीय गायींच्या दुधात आढळतात.
हेल्थलाइनच्या मते, काही अभ्यास A2 आरोग्यदायी असू शकतात, काही अभ्यासांनी A1 बीटा-केसिन हानिकारक असू शकते असे सुचवले आहे.
गवत आणि नैसर्गिक चारा खाणाऱ्या गायींकडून A2 दूध विकत घेण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरते. गीर गायींना संतुलित आहार देऊन गवत दिले जाते ज्यातून तुम्हाला चांगले दूध मिळू शकते.
FSSAI ने नुकतेच एक निवेदन जारी केले आहे. हे दूध आणि त्याच्या उत्पादनांसाठी आहे. कंपन्यांनी दूध, तूप आणि लोण्यावर A1 आणि A2 असे लेबल लावून विक्री करू नये, असे एफएसएसएआयचे म्हणणे आहे.
FSSAI ने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, A2 दाव्यांसह दुधाची उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांचे दावे केवळ दिशाभूल करणारे नाहीत तर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 चे उल्लंघन करणारे आहेत.
अशा लेबलिंगमुळे A2 पेक्षा A1 दूध चांगले आहे असा विचार करून ग्राहकांना गोंधळात पडू शकतात.
दूध आणि दूध उत्पादन कंपन्यांचे दावे देखील सध्याच्या मानकांची पूर्तता करत नाहीत, ज्यामुळे A1 आणि A2 लेबलिंगला काही अर्थ नाही.