Sudesh
सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत कित्येकांचा जीव गेला आहे.
काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा देखील अशाच प्रकारच्या ट्रेंडमुळे मृत्यू झाला.
हा मुलगा सोशल मीडियातील 'क्रोमिंग ट्रेंड'ची कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता.
या ट्रेंडमध्ये परमनेंट मार्कर, स्प्रे पेंट, नेल पॉलिश रिमूव्हर अशा पदार्थांची नशा केली जाते.
सोशल मीडिया येण्याच्या आधीपासून हा ट्रेंड अस्तित्वात होता. मात्र, सोशल मीडियामुळे याचा भरपूर प्रचार झाला आहे.
अशा प्रकारचे पदार्थ नाकावाटे शरीरात घेतल्यामुळे उलटी, मळमळ, तीव्र डोकेदुखी आणि बोलताना अडचण येणं अशी लक्षणं दिसतात.
यामुळे किडनी फेल होणे, हार्ट अटॅक, श्वास घेण्यास अडचण आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूचाही धोका आहे.