Sudesh
सध्या जवळपास सर्वच गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करण्यात येतो. मात्र याचाच फायदा सायबर गुन्हेगार देखील घेताना दिसत आहेत.
सध्या इंटरनेटवर विविध प्रकारचे स्कॅम पहायला मिळत आहेत. यातील काही स्कॅमचा फटका आपल्याला थेट बसतो, तर काही स्कॅम्स इनडायरेक्टली धोकादायक ठरतात.
यातीलच एक प्रकार म्हणजे, डॉक्सिंग स्कॅम. तुमच्या नकळत तुमची सर्व माहिती इंटरनेटवर अपलोड करणे किंवा विकणे याला डॉक्सिंग म्हणतात.
तुमचं नाव, नंबर, आधार क्रमांक, पॅन कार्ड डीटेल्स आणि इतर गोष्टींचा गैरवापर केला जाऊ शकतो. या गोष्टी तुमच्या नकळत एखाद्या कंपनीला विकणे हा एक मोठा स्कॅम आहे.
डॉक्सिंग हा शब्द 'ड्रॉपिंग डॉक्युमेंट्स' या शब्दांपासून तयार झाला आहे. एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती ऑनलाईन लीक करणे यासाठी हा वापरला जातो.
खरंतर डॉक्सिंगविरोधात भारतात अद्याप ठोस कायदा उपलब्ध नाही. मात्र इतर कायद्यांच्या मदतीने याप्रकरणी शिक्षा सुनावली जाऊ शकते.
तुमचा डेटाही असाच लीक झाला असेल, किंवा कोणी तुमची माहिती विना परवानगी शेअर केली असेल; तर Cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता.