फेस सीरम म्हणजे काय? चेहऱ्याला लावण्याचे 'हे' फायदे घ्या जाणून

Monika Lonkar –Kumbhar

फेस सीरम

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फेस सीरम वापरण्यावर महिला भर देत आहेत.

Face Serums

स्किनकेअर

त्वचेला सूट होणारे फेस सीरम्स वापरल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Face Serums

फेस सीरम म्हणजे काय?

फेस सीरम हे अतिशय लाईटवेट असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ते मॉईश्चरायझरसारखे असते आणि ते वजनाने अतिशय हलके अर्थात लाईटवेट असते. मॉईश्चरायझरपेक्षा चांगल्या प्रकारे ते आपल्या त्वचेवर काम करते.

Face Serums

विविध प्रकारचे फेस सीरम्स

लहान-लहान मॉलेक्यूल्सपासून हे वॉटर बेस्ड फेस सीरम बनवले जाते. शिवाय, ते त्वचेमध्ये लवकर शोषले जाते आणि त्वचेला आतून ओलावा देण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी, हायलुरॉनिक अ‍ॅसिड, ग्लायकॉलिक अ‍ॅसिड इत्यादी अनेक प्रकारचे फेस सीरम आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

Face Serums

स्किनकेअर रूटीन

फेस सीरममध्ये उपलब्ध असलेले सक्रिय घटक आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे, अनेक महिला त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये फेस सीरमचा समावेश आवर्जून करतात. काही फेस सीरम हे त्वचेवर अ‍ॅंटीएजिंगचे ही काम करतात.

Face Serums

त्वचेला होतो फायदा

प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार फेस सीरमचे अनेक प्रकार पहायला मिळतात. त्यामुळे, त्यांचे त्वचेला होणारे फायदे ही निरनिराळे असतात. त्वचा ग्लो करणे, त्वचा हायड्रेटेड राहणे इत्यादी अनेक फायदे फेस सीरममुळे होतात. त्वचेला सूट होणारे फेस सीरम्स वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Face Serums

पिंपल्सची समस्या होते दूर

चेहऱ्यावर येणारे मुरूम किंवा पुरळच्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल तर रेटिनॉलयुक्त फेस सीरम चेहऱ्यावर लावा. हे एक अँटी-एजिंग फेस सीरम आहे, जे त्वचेवरील पुरळ, मुरूम आणि ब्लॅकहेड्सच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Face Serums