ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप आहे तरी काय?

Monika Lonkar –Kumbhar

मेकअप

मेकअपमध्ये आता विविध ट्रेंड्सची आणि प्रकारांची सातत्याने भर पडताना दिसत आहे. HD कॅमेरा, HD फोटोनंतर आता HD मेकअपची ही भलतीच क्रेझ सर्वत्र पहायला मिळत आहे.

HD मेकअप

HD मेकअप

काही वर्षांपूर्वी हा मेकअप फक्त बॉलिवूड आणि हॉलवूडपर्यंत मर्यादित होता. कित्येक अभिनेत्री हा एचडी मेकअप खास फोटोशूटसाठी करायच्या. मात्र, आता हा HD मेकअप सामान्य महिलांपर्यंत येऊन पोहचला आहे.

HD मेकअप

HD मेकअप म्हणजे काय?

HD मेकअप म्हणजे हाय डेफिनेशन (High Defination) मेकअप होयं. या मेकअपच्या मदतीने तुमचा मेकअप नॅच्युरल ठेवला जातो. 

HD मेकअप

फ्लॉलेस

HD मेकअपमुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, काळी वर्तुळे, पिंपल्स आणि सुरकुत्या देखील लपवल्या जातात. या मेकअपमुळे तुमची त्वचा फ्लॉलेस दिसते आणि तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो.

HD मेकअप

दीर्घकाळ टिकणारा

शिवाय, हा मेकअप अधिककाळ टिकतो आणि केकी वाटत सुद्धा नाही. या मेकअपचे फिनिशिंग चेहऱ्याला वेगळाच लूक देते. 

HD मेकअप

खर्च

HD मेकअपची सुरूवात 6000  रूपयांपासून होते. HD मेकअपमधील प्रॉडक्ट्स आणि त्याची क्वालिटी यावर ही या मेकअपची किंमत ठरते. या मेकअपचा खर्च साधारण 30 हजारांपर्यंत जाऊ शकतो.

HD मेकअप

HD मेकअपचे प्रकार

HD मेकअपचे तीन प्रकार आहेत. Airbrush HD, Mineral HD आणि Liquid HD हे HD मेकअपचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HD मेकअप