आशुतोष मसगौंडे
अभिनेता आर माधवनने नुकतेच त्याचे वजन कमी होण्यामागचे रहस्य उघड केले आहे, आणि ते काही व्यायाम किंवा जॉगिंक करणे नाही तर अधूनमधून उपवास (intermittent fasting) आहे.
वजन कमी करण्यासाठी आर माधवनने अधूनमधून उपवास करण्याचा, 45-60 वेळा अन्न पूर्णपणे चघळण्याचा आणि संध्याकाळी 6:45 वाजता शेवटचे जेवण करण्याचा सल्ला दिला.
सकाळी लवकर उठण्याचा, लवकर झोपण्याचा, झोपेच्या 90 मिनिटे आधी स्क्रीन टाळण्यावर माधवनने भर दिला आहे.
भरपूर हिरव्या भाज्या आणि सहज पचणारे अन्न खाण्याचा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ न खाण्याचा सल्लाही माधवनने दिला आहे.
WHO द्वारे सार्वजनिक केलेल्या एका संशोधनानुसार उपवास हा विविध धर्मांमध्ये एक आध्यात्मिक प्रथा आहे. पण यामुळे उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या आजरांवर उपचार म्हणून वापरले जाऊ शकते.
इंटरमिटेंन्ट फास्टिंग ही खाण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही खाण्याचा आणि न खाण्याच्या कालावधी निश्चित करता.
12 ते 20 तासांच्या इंटरमिटेंन्ट फास्टिंगच्या कालावधीत, तुम्ही साखर किंवा दुधाशिवाय पाणी, चहा किंवा कॉफी पिऊ शकता.
सर्वात सामान्य पद्धत म्हणजे 16:8 पद्धत, ज्यामध्ये तुम्ही 16 तास उपवास करता आणि 8 तासांच्या कालावधीत जेवता.
5:2 पद्धतीमध्ये, तुम्ही साधारणपणे आठवड्यातून पाच दिवस जेवता आणि तुमच्या कॅलरीजचे प्रमाण दोन दिवसांसाठी 500-600 कॅलरीजपर्यंत कमी करता.