Sandip Kapde
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कारसेवेला गेल्याचा फोटो ट्वीट केला आहे.
बाबरी पाडली तेव्हा अयोध्येला गेल्याचा पुरावा देवेंद्र फडणवीसांनी दिला, त्यामुळे त्यांचे फोटोची जोरदार चर्चा होत आहे. कारसेवा म्हणजे काय असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
सध्या कारसेवा हा शब्द कोणाला फारसा परिचित नाही. पण, 1992मध्ये बाबरी मशीद पाडणाऱ्यांना कारसेवक म्हटले होते.
आता ही कारसेवा म्हणजे काय? कोण होते हे कारसेवक? कोणी केली ही कारसेवा?
का केली कारसेवा? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत.
मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे.
कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत.
निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, असा त्याचा अर्थ आहे. इंग्रजीत हा शब्द Volunteer असा आहे.
कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरुंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे.
ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं.
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती.
राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली होती.
लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते.
रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते.
त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या होत्या.
त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते.
बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.