Amit Ujagare (अमित उजागरे)
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतो, यामध्ये आपल्याला फ्रन्ट आणि बॅक असे दोन कॅमेरा ऑप्शन मिळतात. या दोन्ही कॅमेऱ्यांचं काम वेगळं आहे, पण काय आहे? हे जाणून घेऊयात.
मोबाईचा फ्रन्ट कॅमेरा हा प्रामुख्यानं सेल्फीसाठी वापरला जातो. त्यामुळं त्याला सेल्फी कॅमेरा असंही म्हटलं जातं.
पण या सेल्फी कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं की मिरर इमेज प्रमाणं फोटो काढतो. सेल्फी फोटो व्यवस्थित तपासल्यास ती प्रतिमा आडवी फ्लिप झालेली असते. तर बॅक कॅमेऱ्यामध्ये काढलेला फोटो आहे तसाच येतो.
सेल्फी कॅमेऱ्याचा मेगापिक्सल कमी असतो त्यामुळं त्याची क्वालिटी बॅक कॅमेऱ्यापेक्षा कमी असते.
सेल्फी कॅमेऱ्यात वाईड अँगल लेन्स असतात त्यामुळं या कॅमेऱ्यात जास्त एरिया कव्हर होतो, त्यामुळं तो ग्रुप सेल्फीसाठी योग्य असतो.
सेल्फी कॅमेऱ्याचा फोकस पॉईंट फिक्स असतो त्यामुळं तो फक्त फेस डिटेक्शनला प्राधान्य देतो, तर बॅक कॅमेऱ्यात आपण ऑटो फोकस सुविधा वापरु शकतो.
सेल्फी कॅमेऱ्याचा अपर्चर अर्थात प्रकाश लेन्समध्ये येण्याची जागा खूपच कमी असते. (उदा. F/2.2 )
सेल्फीच्या तुलनेत बॅक कॅमेऱ्यात अधिक फिचर असतात. यामध्ये ऑप्टिकल झूम, इमेज स्टॅबिलायझेशन, डेप्थ सेन्सर, अल्ट्रा वाईड अँगल, पोर्ट्रेट मोड, ब्रोकन इफेक्ट, थ्रीडी मॉडेलिंग आदी फिचर मिळतात.