Saisimran Ghashi
मेनोपॉज ज्याला रजोनिवृत्ती असेही म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया ज्यामध्ये स्त्रीच्या अंडाशयांमधून अंडकूपांचे उत्पादन थांबते आणि मासिक पाळी येणे बंद होते. मेनोपॉज साधारणतः 51 वर्षांच्या सुमारास होतो, परंतु हे वय महिलांनुसार बदलू शकते.
भारतीय महिला आजही या स्थितीबद्दल नवऱ्याला सांगण्यात संकुचित वाटतात.कारण समाजात मेनोपॉज/रजोनिवृत्ती हा विषय जो अजूनही गुप्ततेच्या पडद्यात आहे.
चिडचिडेपणा,मूड स्विंग्स, झोपेचा त्रास, वजन वाढणे ही मेनोपॉजची सामान्य लक्षणे आहेत.
आत्मविश्वास कमी होणे, चिंता, तणाव, एकाकीपणा या भावनांना जन्म देऊ शकतो.
समाजात मेनोपॉजला स्त्रीत्वाच्या नष्ट होण्याशी जोडलेले असते आणि त्यामुळे महिलांना याबद्दल बोलण्यात कमीपणा वाटू शकतो.
मेनोपॉजमुळे दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे महिला आपल्या नवऱ्याला याबद्दल सांगण्यास घाबरतात.
मेनोपॉज/रजोनिवृत्तीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे महिलांमध्ये भ्रम आणि गैरसमज पसरलेले असतात.
मेनोपॉज/रजोनिवृत्तीला आजही एक आजार म्हणून पाहिले जाते, ज्यामुळे महिलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात.
समाजाला काय वाटते यापेक्षा जोडीदाराला साथ दिली पाहिजे. कारण मेनोपॉजबद्दल मुक्तपणे बोलणे आणि या विषयावर जागरुकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही स्त्रीरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ किंवा या विषयावर काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधू शकता.