Saisimran Ghashi
जागतिक स्तरावर मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढल्याने भारतातही या विषयाची चर्चा जोरात सुरू आहे.
पण भारत या गंभीर आजाराच्या विळख्यात आहे काय? मंकीपॉक्स आजार नेमका आहे तरी काय जाणून घेऊया..
मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे जो प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. या रोगाची लक्षणे देवीच्या रोगासारखी असतात. म्हणजेच, ताप, डोकेदुखी, शरीरदुखी, दाने आणि लिंफ नोड्स सूजणे ही लक्षणे दिसून येतात.
संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या अगदी जवळ गेल्याने,संक्रमित वस्तूंना स्पर्श करून आणि लैंगिक संबंधांद्वारे पसरतो.
स्वच्छता राखणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि संशयास्पद लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
भारतात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही, सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे आपण निश्चिंत रहा.
सर्व विमानतळे आणि सीमावर्ती भागात आरोग्य तपासणी वाढवण्यात आली आहे.
मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
जनतेला मंकीपॉक्सबद्दल जागरूक करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वच्छता राखून आणि आरोग्यविषयक सल्ला घेऊन आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.