कार्तिक पुजारी
नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आज संसदेमध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेतली.
सुजय विखे यांचे चॅलेंज स्वीकारून त्यांनी संसदेत मराठीतून नाही तर इंग्रतीतून शपथ घेतली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांचे कौतुक देखील केले.
निलेश लंके यांच्या शिक्षणावरून विरोधकांनी त्यांना अनेकदा हिणवलं होतं. या पार्श्वभूमीवर लंकेंनी किती शिक्षण घेतलंय हे पाहूया
नेता डॉट.कॉम नुसार निलेश लंके पदवीधर आहेत. त्यांनी मे २०१६ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून राज्यशास्त्र विषयात बी.ए केलं.
सुरुवातीला लंकेनी काही कंपन्यांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी स्वत:च एक हॉटेल देखील सुरू केलं होतं.
पण काही काळांनी त्यांनी हॉटेल बंद केलं आहे, पूर्णपणे त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वत:ला झोकून दिलं.
नगर जिल्ह्यातील हंगा गावातून ग्रामपंचायत जिंकून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला होता